दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडच्या ग्रामिण भागात आज 5 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यामुळे आज दिवसभरात शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात 11 जण कोरोनाबाधीत झाले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी ही माहिती दिली. सकाळी दौंड शहरातील राज्य राखीव दल गट क्रमांक 5 मधील सहा जवान कोरोना पॅाझिटिव्ह आले होते. तर तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील 128 व्यक्तींची यवत व स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर मध्ये काल शुक्रवारी ( दि. 14 ) तपासणी करण्यात आली. याचा अहवाल दुपारी आला. 128 मध्ये वरवंड, राहु, केडगाव, यवत व बोरीपार्धी या गावांमध्ये प्रत्येकी एक असे एकूण पाच जण पॅाझिटिव्ह आले. यामध्ये दोन पुरूष व तीन महिलांचा समावेश आहे. तर उर्वरीत तब्बल 123 जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.










