इंदापूर: महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीत 6 जण कोरोनाबाधित आढळल्यानंतर इंदापुरात तपासणी झालेल्या 9 जणांना आज कोरोनाची बाधा झाली. आत्तापर्यंत तालुक्यात 329 जण कोरोना बाधित झाले असून 240 जणांनी कोरोना वर मात केली आहे. सध्या 75 जणांवर उपचार सुरू आहेत.
इंदापूर तालुक्यात आज नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये लुमेवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, तरंगवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, इंदापूर शहरातील कसबा भागातील 44 वर्षीय पुरुष, अकलूज नाका येथील 25 वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर येथील 47 वर्षीय पुरुष, राजवलीनगर येथील 70 वर्षीय पुरुष, पडस्थळ येथील 33 वर्षीय पुरुष, कळंब येथील 82 वर्षीय पुरुष व निरगुडे येथील 39 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यात सध्या उपचार घेत असलेल्या 75 रुग्णांपैकी तब्बल 45 रुग्ण हे बाहेरील तालुक्यांमध्ये उपचार घेत असून तीस जण शहरात उपचार घेत आहेत. आतापर्यंत तालुक्यात कोरोना ने 14 जणांचा बळी घेतलेला आहे.











