दौंड : महान्यूज लाईव्ह
खडकवासला धरण क्षेत्रात मागील दोन तीन दिवासापासून पावसाची संततधार सुरू आहे, यामुळे सध्या खडकवासला धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरण
साठयातील पाणी मागील दोन दिवसापासून भीमा नदीच्या पात्रात व खडकवासला कालव्यात सोडले जात आहे. भीमा नदी च्या पात्रात गुरूवारी ( ता. 13 ) विसर्ग सोडण्यात आला होता. तर आज ( दि. 15 ) सकाळी अकरा वाजता पुन्हा 11704 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
सध्या दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने नदीचे पात्र तुटूंब भरून वाहू लागले आहे. नदीच्या काठावर रहिवासांनी स्थलांतर करावे,
वाहने पार्कींग करू नयेत, नदीच्या पात्रात कोणीही फिरू नये, मासेमारी करणारांनी नदी पात्रात मासेमारीसाठी उतरू नये असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन
विभागाने केले आहे.
दरम्यान धरणाच्या विसर्गात वाढ झाल्यास व भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढल्यास दौंड तालुक्यातील कानगाव, हातवळण, गार, नानगाव, शिरापुर, पारगाव, नानवीज, मलठण, लोणारवाडी, पेडगाव, जुने राजेगाव आदी गावांना पुराचा धोका निर्माण होवू शकतो. नदीच्या पाण्यात वाढ होत असल्याने तालुक्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा व सावनधानतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने दिला आहे.










