बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील भिगवण रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या एका ज्येष्ठ नागरीकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल रात्री उपचारादरम्यान या ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यू झाला. त्यामुळे बारामतीतील कोरोना बळींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. दरम्यान, काल घेण्यात आलेल्या ८० नमुन्यांपैकी ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरीत २१ जणांसह नव्याने घेतलेल्या ५६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
काल सकाळी एकूण ८० नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ५९ नमुने निगेटिव्ह आले असून २१ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. तसेच काल संध्याकाळी ५६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचाही अहवाल प्रतीक्षेत आहे.
दरम्यान, काल रात्री बारामती शहरातील भिगवन रोड येथील एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यामुळे बारामतीतील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या एकोणीस झालेली आहे.










