इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्यातून केंद्राकडे पद्म पुरस्कारासाठी पाठविण्याच्या शिफारशींकरीता राज्य सरकार दरवर्षी वेगवेगळ्या सदस्यांची समिती स्थापन करते. यावर्षी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून त्यामध्ये इंदापूरचे लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचाही समावेश करण्यात आला आहे.
पद्म पुरस्कारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची शिफारस त्या -त्या राज्यांकडून केली जाते. यासाठी राज्य सरकार दहा जणांची समिती स्थापन करते. यावेळी राज्याचे प्रधान सचिव व मुख्य राज्यशिष्टाचार अधिकाऱ्यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार
वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणेच राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे व राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
इंदापूरला हा मान मिळाल्याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.










