इंदापूर : महान्युज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या इंदापूर तालुक्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येबाबत आता काळजीचे वातावरण चिंतेत बदलू लागले आहे. वाढत चाललेल्या कोरोना ग्रस्तांच्या संख्येचा विचार करता येथे वेगवेगळ्या संस्था तसेच जुनी सरकारी कार्यालय पुन्हा वापरण्याची गरज आहे. अशातच शहरातील जुना सरकारी दवाखाना जो सध्या मोडकळीस आहे त्या ठिकाणची इमारत दुरुस्त करून तात्पुरती डागडुजी करून तेथे कोविड सेंटर उभारण्याची आवश्यकता आहे अशी मागणी नागरिक करत आहेत.
शहरातील इंदापूर विचारमंथन परिवारात यासंदर्भात चर्चा सुरू आहे. माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरविंद वाघ, प्रा. कृष्णा ताटे, रिपब्लिकन पक्षाचे नेते शिवाजी मखरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या दवाखान्याचा विचार पुढे मांडला आहे. अरविंद वाघ यांनी तर त्यांच्या खडकपुरा व पोलिस ठाण्यासमोर इल मोठ्या दोन इमारती केअर सेंटर साठी देण्याची तयारी दाखवली आहे.
त्याचबरोबर सरकारी इमारत असलेला जुना दवाखाना ज्याची सध्या अवस्था खराब आहे, त्या दवाखान्याची स्वच्छता व डागडुजी करून दवाखाना देखील वापरात आणण्याची नागरिकांनी सूचना केली आहे.










