बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरात व तालुक्यातील बावीस जण कोरोना बाधित आढळल्यानंतर आज काहीसा दिलासा मिळाला आहे. काल एकूण 42 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आठ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
आढळलेल्या दोन कोरोना बाधित रुग्णांमध्ये बारामती तालुक्यातील सांगवी येथील 26 वर्षाचा पुरुष व राम गल्ली येथील पन्नास वर्षाची महिला असे दोन रुग्ण आहेत. बारामती ची कोरोना बाधितांची संख्या 279 झाली आहे.











