• Contact us
  • About us
Wednesday, September 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वामी समर्थांच्या जयघोषात वालचंदनगरमध्ये पालखी सोहळा

Maha News Live by Maha News Live
January 31, 2020
in राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
स्वामी समर्थांच्या जयघोषात वालचंदनगरमध्ये पालखी सोहळा

वालचंदनगर : अक्कलकोटहून निघालेला श्री स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याचा मुक्काम संपवून वालचंदनगर येथे मुक्कामी पोचला, येथे भाविकांनी स्वामींच्या पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. पालखीच्या आगमनाच्या निमित्ताने घरांसमोर रांगोळी व आरती ओवाळणी भाविकांनी केली. यानंतर भवानीनगर येथेही पालखी सोहळ्याचे स्वागत झाले.

 स्वामी समर्थांच्या जयघोषात वालचंदनगरीत पालखी सोहळ्याचे आगमन झाले. भाविकांनी स्वामींच्या पालखीचे घरासमोर रांगोळी काढून व पालखीचे ओवाळणी करून स्वागत केले. वालचंदनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने मेन कॉलनी, नवीन बाजारपेठ या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक येथे ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. येथील ललिताबाई मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम होता. यंदाचे पालखी सोहळ्याचे २१ वे वर्षे होते. राज्यातील गावोगावी स्वामी समर्थांच्या भक्ताना पादुकांचे दर्शन घेता यावे यासाठी अक्कलकोट संस्थानने ही परिक्रमा सुरू केली आहे.

वालचंदनगर येथील हनुमान मंदिरात सुहास पटवर्धन व सचिन उरणकर यांनी पादुकांची आरती केली. येथील स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा रमेश देशपांडे यांनी सत्कार केला. यावेळी अक्कलकोटचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, वालचंदनगरच्या प्रजापिता  ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या शाखा संचालिका सुवर्णा दिदी, महाबळेश्वरच्या सनराईज कॅन्डल्सचे प्रमुख व उद्यमशील वक्ते भावेश भाटिया, निवृत्त फौजदार मोहन यादव यांचाही सन्मान करण्यात आला.

पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या निमित्ताने तृप्ती देसाई, भावेश भाटिया, मोहन यादव यांनी उपस्थितांना सामाजिक प्रबोधन केले. रात्री महाआरतीवेळी पोलिस मित्र परिवार संघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा शुभांगी चौधर, मंडळाचे जेष्ठ सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर, डॉ विकास शहा, राम कुंभार, राजू भाटिया, जितू दुरुतकर, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे उपाध्यक्ष वैभव कदम, सचिव अमोल राजपूत, खजिनदार निलेश चव्हाण, संचालक अमरसिंह निंबाळकर, विजय कांबळे, राहूल गोडसे, शितल पवार, उमेश सगरे, शंकर  काटे, हणमंत कुंभार, खंडू कुंभार आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कुलकर्णी यांनी केले.

Tags: Swami Palkhi SohlaWalchandnagar
Next Post
बारामती क्राईम ब्रॅंचने वाळू माफियांवर घातला 1 कोटींचा घाव…

बारामती क्राईम ब्रॅंचने वाळू माफियांवर घातला 1 कोटींचा घाव...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group