बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत आज कोरोनाच्या 80 संशयितांची तपासणी झाल्यानंतर त्यापैकी तब्बल 22 जण कोरोना बाधित आढळले आहेत, हा एक प्रकारे आजचा बारामतीतील कोरोनाचा बॉम्बच मानावा लागेल.
आज बारामतीत दुपारी पर्यंत 80 कोरोना नमुन्यांपैकी 22 अहवाल प्रलंबित होते त्यामध्ये बारा जण कोरोना बाधित आढळून आले होते. दुपारनंतर च्या अहवालातील प्रलंबित राहिलेल्या नमुन्यांचा अहवाल आला असून, नव्याने 10 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये
शासकीय अहवालात नमूद केलेल्या पत्त्यानुसार जीवराज नगर येथील 43 वर्षीय पुरुष, भोई गल्ली येथील वीस वर्षीय युवक, आमराई येथील 24 वर्षीय महिला, जगताप मळा येथील 45 वर्षीय महिला, भोई गल्ली येथील 70 वर्षीय पुरुष, इंदापूर रस्त्यावरील 53 वर्षीय पुरुष, कसबा येथील 50 वर्षीय महिला, बारामती ॲग्रो येथील 49 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील तीस वर्षीय पुरुष व मलगुंडे वस्ती येथील 21 वर्षीय युवतीचा यामध्ये समावेश आहे.
बारामतीत दररोज वाढत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या संख्येचा विचार करता बारामतीचा प्रवासदेखील दौंड, पुरंदर या तालुक्यांच्या दिशेने होऊ लागला आहे असेच म्हणावे लागेल. मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण दिसत असताना देखील बारामतीची बाजारपेठ आणि त्यातील गर्दी तेवढीच मोठी दिसत आहे स्वतःहून सोशल डिस्टंसिंग पाळणे ही प्राथमिक गरज असताना देखील तसे घडताना दिसत नाही. बारामती तालुक्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या 300 कडे वाटचाल करत असून आत्तापर्यंत 277 रुग्णांची संख्या झाली आहे











