• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूर तालुक्यात भाऊ-मामाचा वाद पेटला..इंदापूर मध्ये श्रेयाच्या राजकारणात `दुधा`नंतर कोरोनाची एन्ट्री…!

Maha News Live by Maha News Live
August 8, 2020
in मनोरंजन, राजकीय, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
इंदापूर तालुक्यात भाऊ-मामाचा वाद पेटला..इंदापूर मध्ये श्रेयाच्या राजकारणात `दुधा`नंतर कोरोनाची एन्ट्री…!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी- भाजपचा दुधावरील वाद चहाच्या पेल्यावरून आता थेट कोरोनावर पोचला. कोरोनाने देश सोडा, जगात कोणालाच सोडले नसले तरी आज इंदापूर तालुक्यात मात्र थेट कोरोनाचाच विचका राजकारणाने केला.. कोरोना केअर सेंटरचे आज राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते नियोजित उदघाटन संध्याकाळी होणार असतानाच भाजपने हे सेंटर आम्हीच आणले असा दावा करीत दुपारीच त्याचे प्रतिकात्मक उदघाटन करून टाकले. पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींनी या कोविड केअर सेंटरचे उदघाटन केल्याने आता इंदापूर तालुक्यात राजकीय वादापुढे कोरोनाची देखील खैर राहीली नाही असेच चित्र निर्माण झाले…

भिगवण येथील ट्रामा सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचे औपचारिक उदघाटन आज संध्याकाळी वनराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे करणार होते. त्याची तयारीही त्यानुसार सुरू होती. मात्र हे सेंटर आम्हीच पाठपुरावा करून आणले व मागणीही आम्हीच केली होती असा दावा करीत भाजपच्या वतीने इंदापूर पंचायत समिती सभापती, उपसभापतींनी अचानकच त्याचे उदघाटन करून टाकले व आमच्या कामाचे आम्हीच उदघाटन करणार असा दावा केला.
इंदापूर विधानसभेची निवडणूक १० महिन्यांपूर्वी झाली, मतदानातील काट्याची टक्कर त्यानंतरही चालेल असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र एकमेकांची कॉपी करीत, भेटीगाठींतून व कार्यकर्त्यांद्वारे सोशल मिडियात राष्ट्रवादी व भाजप ही लढाई सुरूच राहीली. कोरोनाच्या काळात राज्यमंत्र्यांनी काहीच केले नाही, अशी टिका भाजपने केली. तर कोरोनाच्या काळात संपूर्ण तालुक्यात दत्तात्रेय भरणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन गरजू लोकांना गावागावात जाऊन जीवनावश्यक वस्तू दिल्या, खुद्द माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातही त्यांनी काही मदत केली नाही असा पलटवार राष्ट्रवादीने पाटील यांच्यावर केला. पुढे हा आरोप दुधावरती घसरला. दुधगंगा संघाच्या अवसायनाच्या नोटीशीवरून सुरू झालेला वाद काल-परवा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर थंडावला. मात्र मध्येच वनखात्याच्या हद्दीतील अतिक्रमण हटवण्यावरूनही भाजपने वनराज्यमंत्री भरणेंना लक्ष्य केले. त्यानंतर आता दुध दराच्या आंदोलनातही व नागपंचमीच्या दिवशी सुरफाट्या खेळण्यावरून आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर भरणे यांनी थेट कोविड सेंटरमध्येच जाऊन या राजकारणात बाजी मारली. आज मात्र आजवर सोशल मिडीयात सुरू असलेल्या राजकीय वाकयुध्दाचे जरा अतीच झाले. भिगवण येथील ट्रामा सेंटरचे रुपांतर कोविड केअर सेंटर मध्ये करण्यात आले आहे, त्याचे उदघाटन राज्यमंत्री भरणे करणार आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी आहे. मात्र तत्पूर्वीच या कोविड केअर सेंटरचे भाजपने उदघाटन करून टाकले आणि राजकीय वातावरण पेटवले. आता हे उदघाटन राष्ट्रवादी कोणत्या पध्दतीने घेते व त्याला कसे प्रत्युत्तर देते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे.

संजय देहाडे, उपसभापती, पंचायत समिती, इंदापूर – हे ट्रामा सेंटर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीच त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात मंजूर करून आणले होते, त्याच्या कामाला मागील पाच वर्षात कधी गती दिली नाही. आताही भिगवण एका बाजूला असल्याने व तेथे कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून भाजपनेच कोविड केअर सेंटर होण्यासाठी पुढाकार घेतला होता व त्यासाठी पाठपुरावाही केला होता, मात्र त्याचे राजकारण करून तेथे उदघाटनाचा घाट घातला जात होता. त्यामुळे आम्ही त्याचे रितसर उदघाटन केले.

सचिन बोगावत, शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस – कोरोनाचे कोणीही राजकारण करू नये. भिगवणमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. जिल्हा परीषदेचे सदस्य आहेत. मुळात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून आम्ही हे सेंटर सुरू व्हावे म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. राज्यमंत्री भरणे यांनी सर्व पाठबळ दिले. अगदी टॅंकर सुरू करण्यापासून, खाटा आणण्यापासून आम्ही नियोजन केले आहे. या सेंटरचे औपचारिक उदघाटन आम्ही करण्यासाठी सभापती, उपसभापतींना नियमानुसार आमंत्रण दिले होते. मात्र कोरोनाच्या काळात अडचणी सोडवायच्या बाजूला राहून उदघाटनाच्या नावाखाली स्टंटबाजी करण्यात आली, हे दुर्दैवाचे आहे. या तालुक्यातील विकासासाठी राज्यमंत्री निधी आणत आहेत. त्यांना मदत करण्याऐवजी अशा पध्दतीचे राजकारण करणे गैर आहे.

Next Post
बारामतीतील २३ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; एकाचा अहवाल बाकी

दौंड मध्ये आज दिवसभरात चार जणांना कोरोना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group