दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरात दोन व तालुक्याच्या ग्रामीण भागात दोन असे एकूण चार रूग्ण आज दिवसभरात सापडले आहेत. मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असतानाच आज मात्र काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
काल दौंड शहरातील २९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोनजणांना कोरोनाची लागण झाली असून शिवाजी चौक आणि सरस्वतीनगर भागातील एका महिलेला आणि पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तर २७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
यवत कोवीड सेंटरमध्ये काल २३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील एकेरीवाडी येथील एक महिला व एक पुरुष अशा दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित २१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती यवत ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी दिली. दरम्यान, आज दिवसभरात चार रूग्ण सापडल्याने शहरासह ग्रामीण भागाला थोडा दिलासा मिळाला आहे.










