बारामती : महान्यूज लाईव्ह
आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) च्या वतीने ११६७ जागांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ ऑगस्ट २०२० आहे.
परिविक्षाधीन अधिकारी व मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या या जागा आहेत. संपूर्ण देशातील कोणत्याही शाखांमध्ये काम करण्याची तयारी असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान २० वर्षे व कमाल ३० वर्षे आहे. राखीव प्रवर्गाासठी शासन नियमानुसार वयात सवलत आहे. याची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे. यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी www.ibps.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.











