बारामती : महान्यूज लाईव्ह
आज बारामतीत तपासलेल्या एकूण नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या 21 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती तालुक्यातील 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर इंदापूर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे
बारामती शहरातील 13 व ग्रामीण भागातील 5 रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये डोर्लेवाडी येथील एक रुग्ण, बर्हाणपूर येथील एक रुग्ण, गुणवडी येथील दोन रुग्ण समावेश आहे बारामती शहरांमधील प्रगती नगरतील दोन रुग्ण,महादेव मळा येथील दोन रुग्ण, तांदूळवाडी येथील एक रुग्ण ,रुई येथील चार रुग्ण, आमराई येथील एक रुग्ण, कृषी देवता नगर येथील रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण, खंडोबा नगरमधील एक रुग्ण ,हरिकृपा नगर येथील एक रुग्ण व शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 210 झालेली आहे, तर इंदापूर तालुक्यातील उदमाईवाडी येथे नव्याने एक रूग्ण आढळला असून अकोले येथील एका चिमुकल्या मुलीला देखील कोरोनाची लागण झाली आहे.










