दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडच्या ग्रामीण भागात आज ८ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ६१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
काल बुधवारी (दि. ५) कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील ६९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली, याचा अहवाल आज प्राप्त झाला. यामध्ये ६९ पैकी ८ जणांचा अहवाल हा पॅाझिटिव्ह तर ६१ जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. तालुक्यातील कुरकुंभ व पारगाव येथे प्रत्येकी दोन, देलवडी (एकेरीवाडी), कानगाव, वासुंदे, खडकी या गावात प्रत्येकी एक असे एकूण आठ रूग्ण कोरोना बाधीत सापडले आहेत, हे सर्व कोरोना बाधीत रूग्णांच्या संपर्कात आले होते, अशी माहिती डॉ. रासगे यांनी दिली. दरम्यान, अद्याप दौंड शहरातील कोवीड सेंटरचा अहवाल प्रतिक्षेत आहे.










