इंदापूर : महान्युज लाईव्ह
आज सकाळी आढळलेल्या तीन कोरोनाग्रस्त रुग्णांसह आज दिवसभरात इंदापूर तालुक्यात तब्बल बारा कोरोनाग्रस्तांची नोंद झाली.
तालुक्यातील पोंदकुलेवाडी, शहरातील सावतामाळी नगर व बळपुडी या गावांमध्ये नवे नऊ कोरोना बाधित रुग्ण सापडले. 2 ऑगस्ट रोजी इंदापूर मध्ये 21 कोरोना बाधित आढळल्यानंतर आज पुन्हा तिसऱ्या दिवशी बारा जणांची नोंद झाली. यामुळे सातत्याने वाढत चाललेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये पुन्हा बारा जणांनी भर पडली. आज दिवसभरामध्ये कोरोनाचा एक बळी देखील गेला. आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पोंदकुलेवाडी येथील पाच जणांचा समावेश असून, सावतामाळी नगर येथील तिघेजण कोरोनाग्रस्त ग्रस्त आढळले आहेत. बळपुडी येथे एका नव्या रुग्णाची नोंद झाली.











