बारामती : महान्यूज लाइव्ह
बारामती दररोज कोरोनासाठी गंभीर अवस्थेकडे जात असून आज बारामतीतील रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये तपासलेल्या ९६ कोरोना संशयितांच्या नमुन्यांपैकी तब्बल १६ जण कोरोना बाधित आढळले असून अजूनही १७ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. तर काल प्रतिक्षेत असलेल्या एकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बारामती शहर आणि तालुक्यात आज १४ जणांना कोरोनाची लागण झाली असून इंदापूर तालुक्यातील दोन व दौंड तालुक्यातील एका कोरोनाग्रस्ताचा समावेश आहे.
काल तालुक्यांमध्ये तब्बल ९६ जणांचे कोरोना तपासणीचे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये एवढे १६ रुग्ण आढळले आहेत. आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शहरातील खाटीक गल्ली येथील ४७ वर्षे पुरुष, शहरातील १७ वर्षीय युवक व २२ वर्षीय युवकांचा समावेश आहे. याखेरीज प्रगती नगर येथील ५२ वर्षीय वडिलांसह २४ वर्षीय मुलाचाही समावेश आहे.
तालुक्यातील बरृहाणपुर येथील 57 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर गुणवडी येथे आजही कोरोनाचा रुग्ण आढळला असून गुणवडीतील 37 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 29 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 70 वर्षीय महिला व येथीलच 45 वर्षीय महिला व देवतानगर येथील 36 वर्षे पुरुष रूग्णांस कोरोनाची बाधा झाली आहे. जळगाव सुपे येथील 50 वर्षीय पुरुष रुग्ण, समर्थनगर येथील 65 वर्षीय महिला आदींचा यामध्ये समावेश आहे.
इंदापूर तालुक्यात सात जण कोरोना बाधित
बारामतीत घेतलेल्या नमुन्यांपैकी इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील 63 वर्षीय पुरुष व अकोले येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे. तर इंदापूर तालुक्यात घेतलेल्या 32 नमुन्यांपैकी 5 जण कोरणा बाधित आढळून आले आहेत. यामध्ये इंदापूर शहरातील एक, निमगाव केतकी येथील दोन व भिगवण येथील दोन कोरोनाबाधितांचा समावेश आहे.
बारामतीत घेतलेल्या नमुन्यात दौंड तालुक्यातील कारेगाव येथील दोन वर्षीय बालकाला देखील कोरोना झाला आहे. दरम्यान, परवा घेतलेल्या नमुन्यांपैकी प्रतिक्षेत असलेल्या अहवालांमध्ये एकजण पॉझिटिव्ह आला आहे.











