इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील संशयित कोरोनाग्रस्तांच्या 25 नमुन्यांपैकी 20 जण निगेटिव्ह आले असून तालुक्यातील बाभुळगाव व भिगवण येथे तीन कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील इतर नातेवाईकांचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये भिगवण येथे नव्याने दोन कोरोनाग्रस्त आढळून आले असून बाभूळगाव येथे एक कोरोनाचा नवा रुग्ण सापडला आहे. दरम्यान निमगाव केतकी येथील कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील सर्व संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.











