चला उजळूया प्रकाशवाटा : शशांक मोहिते, भाषण कला प्रशिक्षक व प्रभावी वक्ते
” सरजी , क्या ये पब्लिक स्पिकींग क्लास का नंबर है?” मी ‘हो’ म्हणताच त्याने बोलणे पुढे सुरु केले,” मैं मुंबई में रहता हुँ। पेशेसे मैं कॅबड्राईव्हर हुँ। मुझे कुछ देर पहले पँसेजर मॅडमने आपका फोन नंबर दिया! मेरी बाते सुनकर मॅडमने कहा की, आपकी आवाज बहुत अच्छी है। आप व्हाॅईसओव्हर का ट्रेनिंग लोगे तो आपका उसमें अच्छा करीयर हो सकेगा ।” त्या व्यक्तीचे अदबशीर बोलणे ऐकून मलाही हे प्रकरण इंटरेस्टींग वाटले! (Sir, but there is a difference between the two! That Abdul Razzaq is Pakistani and I am Hindustani .. “Shashank Mohite)
मी विचारले,” तुमचे नाव कळेल का ?”
तो म्हणाला,” सर,मेरा नाम अब्बुल रझ्झाक कुरेशी है।” त्यावर मी गंमतीने म्हणालो,”अब्दुल रझ्झाक नाम जाना पहचाना है। पाकीस्तान के फेमस क्रिकेटर रह चूके है ।”
त्यावर क्षणाचाही विलंब न करता हा पोरगा फोनवर म्हणतोय,” सर , लेकीन दोनोंमें एक फर्क है । वो पाकीस्तानी है और मैं …..हिंदुस्तानी ।”
नंतरही त्याच्याशी भाषणकला बॅचबद्दल फोनवर काही मिनिटे बोललो.
आज पुणे मुंबई प्रवासातील ट्रॅफीक जाममुळे फार वैतागलेल्या जीवाला जेव्हा कळाले की मुंबईच्या एका अनामिक मॅडमकडे आपला फोन नंबर असून त्यांनी तो रेफरन्स म्हणुन कोणाला तरी दिला याचे वेगळे समाधान तर वाटलेच पण अब्दुलचे ते वाक्य जास्त सुखावणारे होते. ” सर, वो अब्दुल रझ्झाक पाकीस्तानी है और मैं हिंदुस्तानी……