बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीमध्ये काल दिवसभरात कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील निकटच्या नातेवाईकांसह इतरही 65 जणांचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी तब्बल ६३ जण निगेटिव्ह आले, फक्त एक महिला कोरोनाग्रस्त आढळली आहे.
आज सकाळी 65 पैकी 37 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बारामतीकरांना तसा काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र 28 अहवाल प्रतीक्षेत असल्याने त्याविषयी उत्सुकताही होती. बारामती दररोज वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे एकीकडे प्रशासन चिंतेत असताना व कोरोना ग्रस्तांच्या वाढत्या मृत्यू दरानेही देखील प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढवली असतानाच बहुतांश जण निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यातील सांगवी येथील एका महिलेचा मात्र अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व एक अहवाल अजून प्रतीक्षेत आहे.










