अनैतिक संबंधातून पतीनेच खूनाचा कट रचल्याचा संशय ; यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील खुटबाव परिसरात एक महिला व एका पुरूषांची धारदार हत्याराने खून केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केले आहे, अशी माहिती यवत चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने दौंड तालुका हादरला आहे.
मनिषा उर्फ हनीबाई उर्फ अशीबाई मंगेश जाधव रा. विठ्ठलवाडी ता. शिरूर जि, पुणे व दिपक वाघमारे रा, भोर जि पुणे, असे खून झालेल्या इसमांची नावे आहेत, गुरूवारी (दि. ३०) रात्रीच्या सुमारास खुटबाव हद्दीतील मटकळा वस्ती येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीसांनी अशीबाई हिचे पती मंगेश अरूण जाधव रा. भोर जि,पुणे याला अटक केली आहे.
आरोपी मंगेश याने या दोघांना धारदार कोयता व लाकडी काठीने हत्या केली. या प्रकरणी खुटबावचे पोलीस पाटील पोपट बाबुराव कांबळे यांनी यवत पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली आहे. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय पोलीसांना असून त्यादृष्टीने आरोपीला तत्काळ अटक करून पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी चौकशी सुरू केली आहे. घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.










