• Contact us
  • About us
Monday, August 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती कारखान्याचा कलगीतुरा! आता जाचक म्हणाले, ‘छत्रपती कारखाना तो झांकी है; श्री छत्रपती शिक्षण संस्था अभी बाकी है!

Maha News Live by Maha News Live
March 19, 2022
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

छत्रपती कारखान्याची निवडणूक लागण्यापूर्वीच आजी-माजी अध्यक्षांमधील कलगीतुरा आता चांगलाच रंगला आहे. जसजसे उन्हाळ्याचे वातावरण तापत आहे, तसतसे छत्रपती कारखान्यावरील आरोप प्रत्यारोपाचे वातावरणही तापू लागले आहे. आज कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यावर पलटवार केल्यानंतर पृथ्वीराज जाचक यांनी संयमाच्या गोष्टी कशाला करता? छत्रपती कारखाना तो झाकी है; श्री छत्रपती शिक्षण संस्था अभि बाकी है! असा इशारा दिला. ( Chhatrapati factory wreath! Now Jachak said, ‘Chhatrapati factory is a tableau; Shri Chhatrapati Shikshan Sanstha is yet to come!)

कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी अगोदर विद्यमान अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रशांत काटे यांनी उत्तर दिल्यानंतर आता पुन्हा एकदा पृथ्वीराज जाचक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे काटे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यामध्ये जाचक यांनी नमूद केले आहे की, आपण संचालक मंडळासोबत दीड वर्ष बसलो, ते श्री छत्रपती कारखाना या मंदिराचा चरण स्पर्श करूनच बसलो; कारण सहकारात पाय धरण्यायोग्य व्यक्तीच राहिलेल्या नाहीत आणि आपण जे बसलो ते सभासदांच्या हितासाठी! आणि फक्त तुम्हालाच आम्ही बसलेले दिसलो; कामगार आणि कष्टकरी सभासदांना आपण बसलेलो दिसलोच नसेल; कारण रात्रीचा दिवस करून आम्ही हंगाम पार पाडला.

याच संचालक मंडळाला त्यापूर्वीच्या हंगामामध्ये दोन्ही युनिट पूर्ण क्षमतेने चालवता आले नव्हते. चांगली वीज निर्मिती करता आली नव्हती. कामगारांचे पगार वेळेवर करता आले नव्हते. त्यांनी आमची कारखान्यात उपलब्धी काय? हे सांगण्याची गरज नाही. सभासद आणि कामगार हे आमचे काम चांगले जाणतात. खरे तर यांचा कारभार पाहून ऊस तोडणी यंत्रणेने सुद्धा कारखान्याकडे पाठ फिरवली होती. त्यांच्यात आज उत्पन्न झालेली विश्वासार्हता ही विद्यमान संचालकाकडे पाहून झालीच नव्हती.

जाचक म्हणतात की, दोन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या व त्यामध्ये कारखान्याची ढासळती परिस्थिती लक्षात घेता स्वतः अजितदादांनी श्री किरण गुजर, कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व कार्यकारी संचालक कै. अनारसे यांच्या समवेत माझी बैठक काटेवाडी येथील दादांच्या निवासस्थानी झाली. त्यामध्ये दादांनी अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना माझ्या कारखान्याच्या कारभारातील सहभागाबाबत आदेश दिले व त्यानंतर श्री पवार साहेबांच्या बरोबर मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी किरण गुजर यांच्यासमवेत बैठक झाली.

त्यामध्ये आदरणीय साहेबांना या सर्व बाबींची कल्पना दिली व नंतर मी कारखान्याच्या कामकाजामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. या भेटीनंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील फेसबुक वर ट्विट केले होते. ते संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. कारखान्याच्या कामकाजामध्ये भाग घेतल्यानंतर होणारी खरेदी, साखर विक्री, मळी विक्री यामध्ये अध्यक्षांनी चालवलेले उद्योग माझ्या लक्षात आल्याने मी त्यास विरोध केला व तेच अध्यक्षांना झोंबले.

काही असंतुष्ट व कारखान्याच्या हिताला बाधा आणणाऱ्या मंडळींना त्यांनी बरोबर घेऊन आकांडतांडव केले. मी कारखान्याच्या कामकाजात सहभाग घेतल्यानंतर हजारो सभासदांनी स्वागतच केले होते. हे सुद्धा विद्यमान अध्यक्ष यांना खटकले होते. उस न घालणारे सभासद हे सातत्याने आठ ते दहा वर्षापासून ऊस घालत नाहीत. अनेकांनी जमिनी विकल्या आहेत. गेल्या आठ वर्षात एखाद्या वर्षात अपवाद सोडला, तर कधीही दुष्काळ नव्हता. याचे हवामान खात्याचे दाखले आहेत. मात्र सहकार कायदा, कारखान्याचे पोटनियम याचा अभ्यास करण्यासाठी नीतिमत्ता व किमान दहावी शिक्षण असले पाहिजे. माझे अध्यक्षांना आवाहन आहे की, त्यांनी आधी आपल्याला पुढील पॅनलमध्ये घेणार आहेत की नाहीत, याची खात्री करावी. मगच सल्ला घेऊन पत्रकार परिषदा घ्याव्यात.

कुठलाही व्यवसाय करताना तो भावनात्मक व सामाजिक दृष्ट्या न करता आर्थिक दृष्ट करावयाचा असतो, याचे भान ठेवावे व मुदत संपल्यानंतर सुद्धा केवळ मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या केसमुळे आपण त्या खुर्चीवर बसलेलो आहोत याची नोंद घ्यावी. वाढीव गाळप केल्याचा डांगोरा पिटताना तो मूळ उत्पादक सभासदाचा ऊस वाळवून व तुरे येईपर्यंत ठेवून गेटकेनचा कोवळा आणून आपण जे गाळप केले आहे, त्याचा लेखाजोखा योग्य त्या व्यासपीठावर आम्ही मांडू. सहकार कलम 88 अन्वये उच्च न्यायालयात साखर विक्री गैरव्यवहार याचिका प्रलंबित आहे व ती विद्यमान अध्यक्षांच्या कारभाराच्या काळातच दाखल झाली आहे याची नोंद घ्यावी. हाच अध्यक्षांच्या कारभाराचा उत्तम नमुना आहे. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना व वाहनचालकांना स्वतःच्या बागेत औषध मारण्यासाठी वापरणारे आजपर्यंत झालेला अध्यक्षांपैकी हे विद्यमान अध्यक्ष पहिले पराक्रमी अध्यक्ष आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.

Tags: न्यायालयीन आदेशमहाविकासआघाडीAjit PawarBaramatiChhatrapati sugar factoryIndapurPrashant KatePrithviraj JachakSharad Pawar
Next Post
सर्वांना सदोदित रंगपंचमीसारखा आनंद मिळो – आ.श्वेता महाले !

सर्वांना सदोदित रंगपंचमीसारखा आनंद मिळो - आ.श्वेता महाले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group