संदीप मापारी पाटील
चिखली : महान्यूज लाईव्ह
रंग पंचमी म्हणजे मनसोक्त आनंद लुटण्याचा सण . स्वतः ला रंग लावून घेणे आणि इतरांना सुद्धा रंगात न्हावू घालून इतरांना सुद्धा आनंद देणारा हा सण . असे सण दररोज असेल तरी प्रत्येक जण त्याला आनंदाने साजरा करतील . असाच आनंद सर्वांच्या जीवनात येऊन सर्वत्र जनतेला रंग पंचमीच्या दिवशी मिळणारा आनंद दररोज मिळो अशा शुभेच्छा आ. श्वेता महाले पाटील यांनी धुलीवंदनाच्या सणाच्या पर्वावर नागरिकांना दिल्या .
आज चिखली येथे आ. श्वेता महाले पाटील यांनी परिसरातील मैत्रिणी व सहकार्यांसमवेत मुक्तपणे रंगांची उधळण केली आणि धूलिवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
नेहमीच्या चिंता, विचार दूर ठेवून वर्षातून एक दिवस तरी मनसोक्त आनंद लुटावा म्हणून भारतीय संस्कृतीत होळी, धुळवड या सणाचे नियोजन केलेले आहे.
या एका दिवसात सर्वांच्याच मनातील नकारात्मकता नष्ट होऊन पुढे वर्षभरासाठी मन ताजेतवाने होते.
त्यामुळे सर्वांनीच मनमुरादपणे या सणाचा आनंद लुटावा, असे आवाहन त्यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आज केले.
बंजारा होळीचा वेगळाच थाट
चिखली मतदारसंघातील मौजे हरणी येथे बंजारा समाज मोठ्या प्रमाणात राहतो . धुली वंदन हा त्यांचा प्रमुख सण . हा सण ते मोठ्या उत्साहात साजरा करतात.
आ. श्वेता महाले यांनी हरणी येथे बंजारा समाज बांधवांसमवेत होळी व धुलिवंदन साजरे केले.
बंजारा समाजात होळीचा सण साजरा करण्याची प्रथा फारच वेगळी असून मनाला अति आनंद देणारी आहे.
नृत्य, गाणी व होळीचे रंग असा हा त्रिवेणी संगम असतो.
होळी आयी ये होळी डगर चाली।
होळी गेरीयान सुनो रकाड चाली।।
अशी विविध गीते गाणार्या बंजारा भगिनींसमवेत आज पारंपरिक बंजारा नृत्यात सहभागी होऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
या वेळी भाजपचे पदाधिकारी, समाजबांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.