इंदापूर : महान्यूज लाईव्ह
आज इंदापुरात पुन्हा एकदा कोरोनाने जोरदार धक्का दिला असून एकाच कुटुंबातील नातेवाईकांसह आठ जणांना कोरोना ची लागण झाली आहे. सणसर येथील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील एकाच कुटुंबातील आठ जणांना कोरोना ची लागण झाली आहे. दरम्यान इंदापूर तालुक्यात दिवसभरात 13 जणांना कोरोना ची लागण झाली.
आज सकाळी 29 जणांचे नमुन्यांचे अहवाल आले होते. त्यापैकी 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते, मात्र त्यानंतर दुपारी 11 जणांच्या अहवालामध्ये तब्बल 5 जण कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये निमगाव केतकी कळाशी, भिगवण येथील कोरोना ग्रस्तांचा समावेश होता. मात्र सणसर येथील कोरोनाग्रस्त माध्यमिक शिक्षकांच्या संपर्कातील 14 नातेवाईकांसह 20 जणांचे नमुने घेण्यात आले होते, त्याचा अहवाल प्रतीक्षेत होता. आता संध्याकाळी तो अहवाल मिळाला असून त्यामध्ये तब्बल 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सणसर मध्ये एकाच दिवशी 8 जणांना लागण झाल्यामुळे गेली सहा महिने जो कोरोना रोखून धरला होता, तो शिक्षकांसह 9 रुग्णांवर पोहोचला आहे. त्यामुळे सणसरच नव्हे, तर आजपासच्या सोळा गावातील लोकही चिंताग्रस्त झाले आहेत.










