दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील नांदूर-सहजपूर भागातील महसूल कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महसूल विभागाच्या गावपातळीवर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
संबंधित कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी नांदुर-सहजपुर परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील कंपनी परिसराची पहाणी केली होती. या भागातील ओद्योगिक वसाहतीमधील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. औद्योगिक परिसरात पाहणी करून आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने ते पुणे येथील खासगी रूग्णालयात दाखल झाले. यावेळी खासगी प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींनाही कोरोनाची बाधा झाल्याचा खासगी अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. दरम्यान, दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी याबाबत आरोग्य विभागाकडे खासगी अथवा शासकीय अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सांगितले आहे.










