इंदापूर : महान्युज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या भागात दररोज कोरोना चे रुग्ण आढळत आहेत. आज सकाळी 24 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दुपारी आलेल्या अहवालात काल घेतलेल्या अकरा नमुन्यांपैकी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये निमगाव केतकीतील तीन रुग्णांसह कळाशी येथे एक व भिगवण येथे पुन्हा एक जण कोरोना बाधित आढळला आहे.
इंदापूर उपजिल्हा रूग्णालय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे यांनी ही माहिती दिली. काल भिगवण, कळाशी व निमगाव केतकी येथील कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील निकटच्या नातेवाईकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये सहा जण निगेटिव्ह आले असून पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान आज सकाळी आलेल्या अहवालामध्ये 29 पैकी 25 जण निगेटिव्ह आले होते. सणसर येथील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील 14 जणांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत.










