माणदेश…बारमाही दुष्काळाचा भाग…इथं दरिद्री आणि विषमता तशी पाचवीलाच पुजलेली असली तरी इथल्या माणसांशी या माणदेशाशी नाळच अशी जुळली आहे की, इथला माणूस पत्थरांशी धडका घेत पाषाणालाही पाझर फोडतो.. अखंड दुष्काळाशी स्थिती, मात्र त्या दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी इथल्या माणसांची असते..इथला प्रत्येक माणूस हा खडतर स्थिती व अनेकविध समस्यांना दोन हात करीतच आपल्या समस्यांवर उपाय शोधतो. कितीही अस्मानी आणि सुल्तानी संकटे आली, तरी नेहमी जमीनीवर पाय घट्ट रोवून उभे राहतो. हे मी का सांगतेय? तर आज अशाच एका माणदेशी कुटुंबाची कथा मी सांगणारैय..ज्या कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीने देशाला राजकारणाचा पाठ पढवलेल्या बारामतीत आपला नावलौकिक कमावला आहे…त्याच बारामती आणि परिसराला नवचैतन्यही दिलंय…हो मी सांगतेय ती कथा, त्या चैतन्यमयी कुटुंबाची..! आशिष आणि शशांक जळक या डॉक्टर बंधूंची..!
इतरांच्या सुखदुःखात समरस होणाऱ्या या जळक कुटुंबातील आशिष हा माणदेशी युवक दिल्लीतल्या प्रतिथयश अशा एम्स सारख्या नामांकित आयुविज्ञान संस्थेला सोडून ग्रामीण भागातील जी कुटुंबे अपत्यसुखासाठी पुण्या, मुंबईत जाऊन महागडे उपचार घेतात, त्या दांपत्यांना समोर ठेवून बारामतीत आला आणि त्याने अवघ्या ४ वर्षात ११०० हून अधिक टेस्ट ट्यूब बेबींचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. जोडीला मोठे बंधू डॉ. शशांक यांनी देखील बारामतीत हृदयरुग्ण, मधुमेह असणाऱ्यांपासून ते इतर सर्वांच्याच दिर्घायुषी आरोग्यासाठी बारामतीत चैतन्य पेरलं..जे आज कौतुकाचा भाग बनले आहे. डॉ. शशांक आणि डॉ. कोयल हे दांपत्य शेकडो नव्हे हजारो रुग्णांसाठी देवदूत बनले आहे. या दांपत्यावर विश्वास ठेवून आज पुणे, नगर व सातारा जिल्ह्यातील शेकडो रुग्ण दररोज चैतन्य ची पायरी चढत असतात व समाधानाने उतरत असतात…
सध्याचा काळ हा धावपळीचा, संघर्षमय जीवनशैलीचा आहे, त्यातून फास्ट फूडसारख्या आहारशैलीला लोकांनी जवळ केले आहे आणि त्यातूनच वंध्यत्वाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आज वेगवेगळ्या समस्यांनी गर्भधारणा न राहण्याचे प्रमाण देशात ५ टक्क्यांवरून अगदी ३० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. हे फक्त मेट्रोपोलिटीन शहरांमध्येच नाही, तर याचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोचले आहे. अशा जोडप्यांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आशिष जळक यांनी जगातले सर्वात अधुनिक तंत्रज्ञान बारामतीत आणले. एम्स सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर या युवा डॉक्टरपुढे पुणे, मुंबईसारख्या कास्मोपॉलिटीन शहरांमध्ये व्यवसायाच्या संधी खुणावत होत्या. मात्र आपण ज्या माणदेशातून आलो, तेथे वैद्यकीय उपचारासाठी होणारी लोकांची परवड लक्षात घेत त्यांनी बारामती ही कर्मभूमी मानली.
डॉ. जळक यांचे वडील महाराष्ट्र बॅंकेत अधिकारी होते. त्यामुळे बारामतीत त्यांचा परिचय मोठा होता. डॉ. शशांक जळक हे बारामतीतील प्रसिध्द ह्दृयरोगतज्ज्ञ आहेत, त्यांच्या जोडीने डॉ. आशिष व डॉ. प्रियंका यांनी बारामतीत चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू केले, आज ४ वर्षात दीड हजार हून अधिक टेस्ट ट्यूब बेबीचे उपचार त्यांनी केले असून त्यापैकी ११०० घरांमध्ये आज गोकुळ नांदते आहे. अगदी चहावाल्यापासून ते उद्योजकापर्यंत सर्व स्तरात डॉ. जळक यांचे नाव आदराने घेतले जाते. पुणे, मुंबईत हे उपचार खूप महागडे आहेत, त्यांना ग्रामीण भागानुसार खर्चाची मर्यादा डॉ. जळक यांनी ठेवली, शिवाय कमाल वयाच्या दरम्यान गर्भधारणेचे प्रमाण कमी होत जाते, अशावेळी टेस्ट ट्यूब बेबीसाठी उपचाराचा खर्च लक्षात घेता, त्याच्या यशस्वीतेचे प्रमाण लक्षात घेत, त्यांच्या दवाखान्यात दोन चाचण्या अपयशी ठरल्या, तर तिसरी, चौथी पूर्ण मोफत केली जाते. फक्त पैसा महत्वाचा नाही, ग्रामीण भागाला दिलासा देण्याचा त्यांचा हेतू आहे आणि तोच शेकडो दांपत्यांसाठी महत्वाचा आधार बनला आहे.
मी बारामतीत आलो, ते ग्रामीण भागाच्या समस्या पाहूनच.! मी मनात आणले असते, तर मेट्रोपॉलिटीन शहरांमध्येही माझा वैद्यकीय व्यवसाय करू शकलो असतो. पण मला व्यवसायापेक्षा सेवेची जाण होती. मी ज्या भागातून आलो आहे, त्या भागातील समस्या व त्यावरची आपली कर्तव्याची दिशा ठरवून मी बारामती हीच माझी कर्मभूमी मानली. आज पाच वर्षात मी बारामतीकरांचा आणि बारामतीकर माझे बनलेत. चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने पुणे, नगर व सातारा जिल्ह्यातील हजारो दांपत्यांना विश्वास मिळवून देत त्यांच्या आयुष्यात आनंद आणला. आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत, उलट आम्ही ऋणी आहोत की, अशा हजारो दांपत्यांनी आमच्यावर मनापासून विश्वास ठेवला, त्यांनी आम्हाला व्यवसाय नव्हे तर सेवेची संधी दिली. : डॉ. आशिष जळक










