अनिल गवळी
पुणे : महान्यूज लाईव्ह
विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी संपन्न झाली. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयातील शिक्षिका दीपा व्यवहारे यांनी केले.
विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सावित्रीबाई फुले यांनी सुरुवातीच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेने मुलींना शिकविण्यास प्रारंभ केल्याचे सांगितले. तत्कालीन विरोध झुगारून हा कर्मयज्ञ अखंड चालू ठेवल्यामुळेच आजची समाजातील स्त्री शिक्षणाची उत्कृष्ट स्थिती आपणास पहावयास येते आहे, असे सांगून सर्वांनी खूप शिका व खूप मोठे व्हा, असा मोलाचा संदेश दिला.
विद्यालयातील शिक्षिका वहिदा अवटी यांनी आपल्या मार्गदर्शनातून सावित्रीबाईंचा जीवन परिचय करून दिला व सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली. सावित्रीबाई ह्या पहिल्या स्त्री शिक्षिका व स्त्री मुख्याध्यापिका असल्याचे सांगून त्या उत्तम कवयित्री असल्याचे सांगितले व त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. सर्वांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असेही सांगितले.
याप्रसंगी गोरक्षनाथ केंदळे, मच्छिद्र रकटे, अरविंद शेंडगे, घनशाम पाटील, युवराज देशमुख,आशा भोसले, दीपाली जाधव, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, कल्पना पैठणे आदी शिक्षकवृंद, तसेच दीपक जांभूळकर, कैलास वाडकर, लोखंडे नानी , सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी गायकवाड यांनी केले.