बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहर व तालुक्यात काल घेतलेल्या 53 जणांच्या नमुन्यात 46 जण निगेटिव्ह आले असून तीन जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. आणखी चार जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे
बारामतीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल 53 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 46 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व चार जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. पॉझिटिव्ह आलेल्या तीन जणांमध्ये भीम नगर बारामती येथील तीस वर्षाची महिला तसेच पतंगशहानगर येथील 25 वर्षाचा युवक व निरावागज येथील पन्नास वर्षाच्या पुरुषांचा समावेश आहे. बारामतीमधील एकूण रुग्णांची संख्या 127 झालेली आहे त्यामधील 62 रुग्ण बरे झालेले आहेत व 54 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंंत अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे.











