वाटा रोजगाराच्या
बारामती : महान्यूज लाईव्ह
स्टेट बॅंकेत देशभरात विविध ठिकाणी सर्कल बेस्ड ऑफिसर (एसबीओ) पदाच्या ३ हजार ८५० जागांची भरती होणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ ऑगस्ट २०२० आहे.
एकट्या महाराष्ट्रात यातील ५१७ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये कोणत्याही विद्यापीठाची पदवी ही शैक्षणिक पात्रता आहे. याकरीता खुल्या गटातील उमेदवारासाठी कमाल ३० वर्षे वयाची अट असून उमेदवार हा २ ऑगस्ट १९९० पूर्वी जन्मलेला नसावा. राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयात सवलत आहे.
या भरती परीक्षेसाठी खुल्या व ओबीसी उमेदवारांना परिक्षा शुल्क ७५० रुपये असून अनुसचित जाती, जमाती प्रवर्गाकरीता शुल्कमाफी आहे. याची भरती प्रक्रिया ही लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे. अधिक व सविस्तर माहितासाठी http://www.sbi.co.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.











Mayur Nandakumar bankar
Post karawagaj
Til Baramati
Dist pune