दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरातील २१ ते ५५ वयोगटातील १४ जणांसह तालुक्यातील १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील १४ जणांचा कोरोना विषाणू चा तपासणी अहवाल पाँझिटिव्ह आला आहे अशी माहिती उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
काल शहरातील कोरोना बाधीत व्यक्तिच्या संपर्कातील १३१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये शहरातील विविध भागात १४ कोरोना बाधीत नवे रूग्ण सापडले आहेत. तर ११७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दौंडच्या ग्रामीण भागात भांडगाव येथे दोन, खुटबाव व बोरीपार्धी येथे प्रत्येकी एक असे चार जण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज दिवसभरात एकुण १८ नवे कोरोनाचे नवे रूग्ण सापडले आहेत.










