• Contact us
  • About us
Tuesday, September 1, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीवर कोरोनाची दहशत; आरोग्य प्रशासन कोरोना रोखण्यात अपयशी..?

Maha News Live by Maha News Live
July 24, 2020
in राष्ट्रीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
बारामतीवर कोरोनाची दहशत; आरोग्य प्रशासन कोरोना रोखण्यात अपयशी..?

१० रुग्णांमागे एकाचा मृत्यू.. १० जणांचा कोरोनाने घेतला बळी

बारामती : महान्यूज लाईव्ह स्पेशल

बारामतीत कोरोनाने आजपर्यंत दहाजणांचा बळी घेतला आहे. आतापर्यंतचे मृत्यू आणि रुग्णांची संख्या पाहता १० रुग्णांमागे एकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बारामतीकरांवर कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. त्याचवेळी आरोग्य प्रशासन कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे.  त्यामुळे आता बारामतीत पुन्हा एकदा सामूहिकपणे काम करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती कोरोनामुक्त करण्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.

बारामतीत आजपर्यंत तब्बल १०७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत ६० पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बारामती शहरातील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. बारामतीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून प्रशासनाने सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. मात्र लॉकडाऊनच्या काळात ४० हून अधिक व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतरही प्रशासनाच्या हाती अपयशच आल्याचे स्पष्ट झाले आहे.

बारामतीत मार्चपासून जून महिन्यांपर्यंत कोरोनाला रोखण्यात यश आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेला बारामती पॅटर्न यशस्वी ठरला होता. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहर आणि तालुक्यात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पर्यायाने बारामतीत कोरोनाची दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाकडून याबाबत कोणतेही गांभीर्य दाखवले जात नाही. याबाबत मागील आठवड्यात ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ना. अजित पवार यांच्यासमोर ही बाब मांडली होती. त्यावर अजितदादांनी आपल्या शैलीत प्रशासनाचा समाचार घेतला होता. काम जमत नसेल तर घरी जा असा इशारा ना. अजित पवार यांनी दिला होता. शहर आणि तालुक्यातील कोरोना स्थितीबाबत स्थानिक पदाधिकारी सातत्याने विविध बाबी ना. पवार यांच्या निदर्शनास आणून देत आहेत. त्यामुळे लागेल ती मदत ना. पवार उपलब्ध करून देत आहेत.

वास्तविक बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ना. अजित पवार यांच्यामुळे कोरोना उपचार केंद्र, तपासणी यासह अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना लागलीच निदान होऊन उपचारही मिळू लागले आहेत. परंतु हेवेदावे, एकमेकांना असहकार्याची भूमिका यामुळे कोरोना उपाययोजना राबवण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासनात समन्वय नसल्यामुळे शहर आणि तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याचीही चर्चा होऊ लागली आहे.

एकूणच, बारामती म्हटले की ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची नावे पुढे येतात. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात बारामतीच्या नावलौकीकाला साजेल असे काम प्रशासनाकडून व्हायला हवे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरीक व्यक्त करीत आहेत.  

ठोस उपाययोजनांची गरज..!

बारामतीतील सद्यस्थिती पाहता वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या आणि लक्षणीय मृत्यूदर याकडे आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटकाळात जास्तीत जास्त उपाययोजना राबवण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. मागील काळात प्रशासनाने दाखवलेले गांभीर्य, पदाधिकाऱ्यांची साथ आणि नागरिकांनी दाखवलेला समंजसपणा यामुळे बारामती कोरोनामुक्त झाली. आताही त्याच पद्धतीने कामकाज करून पुन्हा एकदा बारामतीला कोरोनामुक्त करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे.   

खासगी डॉक्टरांचा सहभाग वाढायला हवा..!

बारामतीत सध्या वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता आता कोरोना निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न  होणे आवश्यक आहे. सध्या बारामतीत अनेक खासगी डॉक्टर्स कोरोनाच्या लढ्यात काम करत आहेत. मात्र एकूण संख्या पाहता खासगी डॉक्टरांचा कोरोनाच्या लढ्यात सहभाग वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच बारामती पुन्हा कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.  

आरोग्यसेवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज

वास्तविक कोरोनाच्या लढ्यात प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष आरोग्यसेवकांवर मोठी जबाबदारी असते. रुग्ण आढळल्यानंतरचे त्या-त्या भागात सर्वेक्षण, आजारी रुग्णांबाबत घ्यावयाची काळजी अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या आरोग्य सेवकांकडून पार पाडल्या जातात. सध्याच्या काळात या आरोग्यसेवकांना प्रोत्साहन देत त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांकडेही द्यायला हवे लक्ष..!

बारामतीत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून बारामती नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. त्या-त्या पातळीवर अधिक जोमाने काम करून स्वच्छता विभागाचे कर्मचारी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. त्यातही एखादा कोरोनाबाधित रुग्ण दगावला; तर त्याच्यावर अंत्यसंस्काराची जबाबदारीही स्वच्छता विभागातील कर्मचारी उचलत आहेत. मात्र अशावेळी अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान ७-८ दिवसांसाठी सुट्टी द्यावी लागते. पर्यायी कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत पुन्हा आहे त्याच लोकांवर अधिकची जबाबदारी पडते. त्यामुळे प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.  

Tags: baramati coronaCorona Virusdeath in baramatiNeed Action
Next Post

अखेरपर्यंत ज्ञान आणि न्यायदानाचं कर्तव्य बजावणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group