बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील ६३ जणांपैकी ५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिसरात वास्तव्यास असलेल्या एका २२ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आणखी दहाजणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती शहरात मागील आठवड्याभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन कामाला लागले असून पुढील धोका टाळण्याच्या उद्देशाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने काल ६३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील ५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर टिसी कॉलेज परिसरातील २२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे.
अद्याप दहाजणांचे तपासणी अहवाल वेटींगवर आहेत. एकूणच ५२ जणांची तपासणी निगेटिव्ह आल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.










