• Contact us
  • About us
Tuesday, September 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साखर उत्पादनात यंदा जय महाराष्ट्र…!

tdadmin by tdadmin
December 15, 2021
in यशोगाथा, सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, Featured
0

दिल्ली महान्यूज लाईव्ह

१५ डिसेंबर २०२१ पर्यंत देशातील ४७१ साखर कारखान्यातून ७५ लाख टनापेक्षा अधिक साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असून चालू गळीत हंगामा अखेर ते ३१५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. यात महाराष्ट्राने आघाडी मारली असून तेथील १८४ साखर कारखान्यांनी सर्वाधिक म्हणजे ३१.९० लाख टनाचे उत्पादन केले आहे.

हंगामाअखेर महाराष्ट्र ११० लाख टनाचे साखर उत्पादन करून यंदा देशात प्रथम क्रमांकावर राहील असे दिसते. त्या खालोखाल उत्तर प्रदेशाचा क्रमांक असून तेथील ११७ साखर कारखान्यात १८.६० लाख टनाहून अधिक साखरेचे उत्पादन झाले असून हंगामा अखेर ते १०७ लाख टन होण्याचा अंदाज आहे. कर्नाटकातील ६९ साखर कारखान्यातून १७.९० लाख टन नवे साखर उत्पादन झाले असून हंगाम अखेर ४८ लाख टनाचा साखर उत्पादनाचा अंदाज आहे असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे.

देशभरातील ४७१ साखर कारखान्यात आतापर्यंत (१५ डिसेंबर) ८२० लाख टन उसाचे गाळप झाले असून त्याचा सरासरी साखर उतारा ९.२२ टक्क्यापेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी १५ डिसेंबर २०२० पर्यंत देशातील ४५८ साखर कारखान्यांनी ८१९.५७ लाख टन उसाचे गाळप केले होते व त्यातून जवळपास ७४ लाख टन साखरेची निर्मिती झाली आणि सरासरी साखर उतारा ९.०२ टक्के होता. म्हणजेच यंदाचा विक्रमी गाळप हंगाम गतवर्षीच्या हंगामापेक्षा सर्वच बाबतीत थोडाफार वरचढच असल्याचे चित्र समोर येत आहे.

यंदा साखरेच्या सरासरी उताऱ्यात उत्तराखंड (१० टक्के) ,उत्तर प्रदेश (९.४०) ,महाराष्ट्र ( ९.३५ ) बिहार ((९.१५) व कर्नाटक (९) ही राज्ये अग्रेसर आहेत. त्यानंतर गुजरात (८.८५), पंजाब (८.७५), तामिळनाडू (८.५०), हरियाणा (८.१०), व आंध्र प्रदेश , तेलंगणात प्रत्येकी ८ टक्के अशी स्थिती आहे. अर्थात आता अधिक साखर उताऱ्याचा कालावधी नुकताच सुरु झाल्याने हंगामाअखेर सरासरी साखर उताऱ्यात चांगली वाढ दिसण्याचे तज्ज्ञांचे अनुमान आहे.

कोविड महामारीतही ऊस लागवड व साखर उत्पादन वाढले असून या महामारीच्या काळात घातलेली बंधने शिथिल केल्याचा फायदा साखर उदयोगाला होत आहे. इथेनॉल प्रकल्पही प्रगतीपथावर असून ३० नोव्हेंबर अखेर संपलेल्या इथेनॉल वर्ष २०२०-२१ मध्ये विक्रमी ३०२.३० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा देशभरातील २७५ आसवनी प्रकल्पातून तेल कंपन्यांना झाला असून त्याद्वारे देशभरात सरासरी ८.१ टक्के मिश्रणाचे प्रमाण गाळले गेले आहे . या एकाच वर्षात इथेनॉल पुरवठ्याच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयांची मिळकत इथेनॉल पुरवठादारांना झाली असून ही भारत देशातील सर्वोत्तम विक्रमी कामगिरी ठरली आहे.

जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ – यंदाच्या वर्षी साखर निर्यातीत देखील देशभरातील साखर कारखान्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. वर्ष २०१९-२० मधील ५९ लाख टन साखर निर्यातीनंतर वर्ष २०२०-२१ मध्ये विक्रमी ७२ लाख टन साखरेची यशस्वी निर्यात झाली असून चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच ३५ लाख टन अनुदान विरहित साखर निर्यातीचे करार झाले आहेत व यात सहकारी क्षेत्राचा सुमारे ४० टक्के वाट आहे

Next Post
black google smartphone on box

सावधान, जर तुम्ही गुगल क्रोम ब्राऊझर वापरत असाल तर ! तुमच्यासाठी सावधगिरीचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group