संदीप मापारी पाटील
लोणार : महान्यूज लाईव्ह
अमरावती जिल्ह्यातील कारला येथील सौ.उषा सुखदेव खडसे यांचा निर्घुण खून करुन, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून मुख्य आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी.
या घटनेचा जाहीर निषेध म्हणून लोणार येथे मा. तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम, वीर लहुजी ग्रुप, व लहुजी ब्रिगेड यांच्या वतीने प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक विजय अंभोरे यांच्या आदेशावरून देण्यात आलेल्या पत्रात मागणी करण्यात आली.
यावेळी अण्णाभाऊ साठे सोशल फोरम युवा जिल्हाध्यक्ष मनीष साहेबराव पाटोळे, कृष्णा बाजड, संतोष मिसाळ, राजू घाटोळे , नितीन घाटोळे, सुनील पाटोळे ,हरीश बाजड, विशाल जाधव ,दीपक हांगे ,राहुल तोडे, संजय पाटोळे, पवन हिवाळे आदी उपस्थित होते.











