बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील मुढाळे, ता. बारामती येथील जिल्हा परिषद शाळेत १४ सप्टेंबरला चोरी झाली होती. यामध्ये शाळेतील कॉम्य्पुटर आणि शालेय पोषण आहाराची भांडी चोरुन नेली होती.
या गुन्ह्याचा बारामती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शोध घेतला असून गावातील राजेंद्र जाधव व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. राजेंद्र मारुती जाधव याने लक्ष्मण मल्हारी सकाटे, राहुल वसंत सकाटे ( सर्व रा. मुढाळे, ता. बारामती ) यांच्या मदतीने ही चोरी केली होती. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरलेला ऐवजही ताब्यात घेतला आहे.











