महान्यूज टीम
ज्या दक्षिण आफ्रिकेला नव्या ओमीक्रॉनचे जन्मस्थान मानण्यात आले आहे, तिथे ओमीक्रॉने चांगलाच जोर पकडल्याचे दिसते आहे.
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांची कोवीड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राष्ट्रपतींना हलकी लक्षणे जाणवत असून सध्या ते विलगीकरणात आहेत.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची चौथी लाट येत असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. १२ डिसेंबरला तिथे ३७८७५ संक्रमित सापडले, जे ११ डिसेंबरला सापडलेल्या १७१५४ संक्रमितांच्या दुपट्टीहून जास्त होते.
यापैकी ओमीक्रॉन कोरोनाचे प्रमाण किती आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतू या अचानक मोठ्या वाढीमागे ओमीक्रॉन कोरोनाच असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.
इकडे इंग्लडमध्ये ओमीक्रॉनचे रविवारी १२३९ संक्रमित सापडले. याबरोबर या देशातील ओमीक्रॉनच्या एकुण रुग्णांची संख्या ३१३७ झाली आहे. इंग्लडच्या शास्त्रज्ञांच्या मतानूसार महिनाअखेरपर्यंत हा आकडा लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
सध्याच्या उपलब्ध लशी ओमीक्रॉनवर फारशा परिणामकारक ठरत नाहीत, असे आतापर्यंतच्या निरीक्षणावरून दिसते आहे. तसेच ओमीक्रॉन इतर कोरोनाच्या विषाणूंपेक्षा खुप वेगाने पसरतानाही दिसतो आहे.











