महान्यूज टीम
” बायकोच्या स्वतंत्र होण्याच्या प्रयत्नांमुळे मुलांवरील पालकांचा अधिकार संपतो. जी आई स्वत: शिस्त पाळत नाही, ती मुलांना शिस्त पाळण्याचा आग्रह धरते. पुरुषाला खाली ओढताना बायको आणि आई खरेतर शिस्तीच्या बाबतीत स्वत:लाच खाली ओढत असतात.”
सीबीएसईच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. त्यावरून दररोज नवे वाद पुढे येत आहेत. ताजा वाद हा याच परिक्षेतील १० च्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत दिलेल्या एका परिच्छेदावरून सुरु झाला आहे. सुरुवातीचा मजकूर हा त्या परिच्छेदाती इंग्रजी मजकूराचा मराठीत होणारा मतितार्थ आहे. या मजकुरावरून झालेल्या वादानंतर सीबीएसई बोर्डाने हा प्रश्न रद्द केला असून हा प्रश्नाचे पुर्ण गुण विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीएसई परिक्षेत प्रश्नपत्रिकांचे अनेक सेट दिले जातात. त्यापैकी एक सेटमध्ये ३ परिच्छेदाचा उतारा देण्यात आला होता, त्यापैकी एका परिच्छेदात वरीलप्रमाणे मजकूर होता.
हा मजकूर स्त्रियांना कमी लेखणारा असून तातडीने यावर कारवाई व्हावी अशी मागणी अनेकांनी केली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही इंग्रजीचा हा पेपर रद्द करण्याची मागणी केली आहे.
अखेर सीबीएसई बोर्डाने या परिच्छेदावर आधारीत प्रश्नाचे पुर्ण गुण विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे.











