लोणार : महान्यूज लाईव्ह
भारतीय बौद्ध महासभा लोणार तालुक्याच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य प्रवक्ते म्हणून प्राध्यापक सुभाष खरात हे होते. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष खंडारे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत भारतीय बौद्ध महासभेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले संघपाल नागवंशी पनाड, भाई विलास लहाने , प्राध्यापक खरात सर यांनी विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा तालुका सरचिटणीस सुरेश सीताराम मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका उपाध्यक्ष राहुल आंभोरे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घेवंदे सर होते
या कार्यक्रमाला अण्णाभाऊ इंगळे, दिपक अंभोरे,अरूण लहाने, संतोष साळवे, प्रदीप मोरे,वामनराव वेहल, राजहंस जवळे, प्रसेनजित पनाड, चिंतन पनाड, भागवत साळवे, सुनील इंगळे, सुभाष मोरे, संदीप गवई,अरुण देबाजे, विष्णू मोरे, मुरलीधर मोरे उपस्थित होते.











