अमोल होरणे : महान्यूज लाईव्ह
रिझर्व्ह बँकेने पुणे जिल्ह् नंतर आता नगर जिल्ह्याकडे मोहरा वळवला असून नगर जिल्ह्यातील नगर अर्बन को-ऑपरेटिव बँकेवर निर्बंध घातले आहेत. आता या बँकेतून फक्त दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल.
बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळत असल्याने रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी लागू असतील. याखेरीज रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय या बँकेला कोणालाही कर्ज देता येणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारचे कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. बँकेच्या कोणत्याही संपत्तीची विक्री करण्याचा अधिकारही रिझर्व्ह बँकेने काढून घेतला आहे.
रिझर्व बँकेच्या नियमानुसार व नव्या आदेशानुसार आता या बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून दहा हजारापेक्षा आता अधिक रक्कम करता येणार नाही. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.