पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्याच्या राधिका राणे – भोसले अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या मिसेस आशिया यूएसएच्या उपविजेत्या ठरल्या आहेत. विवाहित महिलांसाठीची अमेरिकेतील ही महत्वाची सौंदर्यस्पर्धा मानली जाते.
एसजीएस टेलिकॉम या स्टॉर्टअपच्या उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या राधिका यांनी ४८ आशियायी देशांतील सहभागी महिलांमध्ये हे विजेतेपद मिळविले आहे.
राधिका यांचा जन्म व शिक्षण मुंबईतील असून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी तर व्यवसाय प्रशासनामध्ये पदवीत्तूर पदवी घेतलेली आहे. पुणे येथील उद्योजक शिरीष आणि शर्मिला भोसले यांच्या त्या सून असून त्यांचे पती अमर हे फेसबुक मध्ये वरिष्ठ सुरक्षा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
राधिका यांनी आपला पोशाख आपल्या लहान बाळाला पाठीवर घेऊन युद्ध करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रेरणेतून तयार केला होता.
या पुरस्कारासाठी त्यांनी सनीवेल शहराच्या महापौर लॅरी क्लेन यांच्यासोबत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या आर्शिवादाबाबत त्यांचेही आभार मानले आहेत.