इंदापूर : महान्यूज लाईव्ह
संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत १४५ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये २७ अपंग बांधवांची प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहिती योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी दिली.
इंदापूर तहसिलदार कार्यालयात जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून संजय गांधी निराधार योजनेची बैठक सागर मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी संजय गांधी ७६, इंदिरा गांधी २५, श्रावणबाळ योजनेतून ४४ अशा एकूण १४५ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. यामध्ये २७ अपंग बांधवाच्या प्रकरणांचा समावेश आहे.
यावेळी नायब तहसिलदार प्रियंका वायंकर, पंचायत समितीचे एस.ओ.जगताप, सं.गो.यो. सदस्य रहेना मुलाणी, हनुमंत कांबळे, लक्ष्मण परांडे, नितीन शिंदे, महादेव लोंढे,अजय भिसे आदी उपस्थित होते.