
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरात आजही दोन रुग्ण आढळले असून एक 10 वर्षीय मुलगी व 27 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे.
काल इंदापूर शहरात बाब्रसगल्ली येथे आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील निकटच्या व्यक्तींचे नमुने प्रशासनाने घेतले होते, त्यामध्ये या दोघींना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. उध्दट येथेही जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यास कोरोना ची लागण झाल्यानंतर त्याच्या पत्नी व मुलीसही कोरोनाची बाधा झाली, मात्र इतर निकटच्या संपर्कातील संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मात्र यानिमित्ताने तालुक्याचा जवळपास निम्मा भाग लाँकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान दररोज आढळत असलेल्या कोरोनाग्रस्तांमुळे कोरोनामुक्त तालुक्याचे प्रशासनाचे स्वप्न मात्र धुसर बनत चालले आहे.











