• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विषय जिथे गंभीर, तिथे अजितदादांची बारामती सदैव असते खंबीर…!!

Maha News Live by Maha News Live
July 8, 2020
in मुंबई, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ
0

पुन्हा एकदा बारामतीची कोरोना हेल्पलाईन ठरली हेल्पफुल…

स्थळ :  पुण्यातील नामांकित खाजगी हॉस्पिटल…दिवस – आजचाच.. हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये राज्यातील वरिष्ठ पदावर काम केलेले पोलीस अधिकारी असतात बसलेले.. ते कोरोना पॉझिटिव्ह असतात… ऑक्सिजनची पातळी 75% वर आलेली असते आणि त्यांना आयसीयूचा बेड मात्र उपलब्ध नसतो, विषय पैशाचा नसतोच मुळी… पण पुण्यातील खासगी दवाखान्यात देखील कोरोनाची स्थिती काय आहे हे दर्शवणारे भीषण वास्तव ते अधिकारी डोळ्याने पाहत असतात… नातेवाईकांची घालमेल सुरू असते… अन् अशावेळी त्यांच्या मदतीला धावून येते ती, बारामतीची कोरोना हेल्पलाइन..!!

सलग दुसऱ्या आठवड्यात बारामतीतील कोरोना ग्रस्तांसाठी खरेतर तयार केलेली कोरोनाची हेल्पलाईन, इतरांसाठी देखील कशी मदतीसाठी तत्पर असते याचा नमुना आजही पहावयास मिळाला. या कोरोना हेल्पलाइनमध्ये बारामती शहरातील नामांकित डॉक्टर्स विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी सहभागी आहेत. आज या हेल्पलाईनमधील सदस्य असलेले बालरोगतज्ञ डॉक्टर भास्कर जेधे देशमुख यांना एक फोन आला. फोनवर पलीकडे असलेल्या एका नातेवाईकांनी त्यांना पुण्यामध्ये आयसीयू बेड उपलब्ध करण्याबाबतची विनंती केली.

हे आयसीयू बेड ज्यांच्यासाठी हवे होते ते राज्यातील वरिष्ठ स्तरावर काम केलेले निवृत्त पोलिस अधिकारी होते. दुर्दैवाने ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते आणि त्यांची ऑक्सिजनची पातळी हळूहळू कमी होत चालली होती. मात्र दवाखान्यात त्यांच्यासाठी बेड उपलब्ध नव्हते. जे अधिकारी याबाबतीत वेटिंगवर होते, आत्तापर्यंत कैक वेळा त्यांच्या एका इशाऱ्यावर  अनेक जणांना दवाखान्यामध्ये प्रवेश मिळाला असेल, मात्र पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णांची आकडेवारी किती प्रचंड आहे व आता मोठा असो की, बडा व्हीआयपी असो, कोरोनाने त्यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा केला आहे, याची प्रचिती या अधिकाऱ्यांना इथेच आली.
 बराच काळ त्या दवाखान्याच्या वेटिंग रूममध्ये बसून बेड मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या या अधिकाऱ्यांची प्राकृतिक स्थिती खालावत चालल्याने नातेवाईकांसह यापूर्वी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही अस्वस्थता वाढली,  या अधिकाऱ्यांनीही इतरत्र संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र सगळीकडे कोरोनाचे रुग्ण असल्याने कोणताच दवाखाना आमच्याकडे एखादी जागा रिकामी आहे असे सांगत नव्हता. अशावेळी नातेवाईकांना बारामती आठवली आणि त्यांनी येथे नक्की समस्या सुटतील असा आशावाद लक्षात घेऊन डॉक्टर जेधे यांना संपर्क साधला होता. डॉक्टर जेधे यांना चार दिवसांपूर्वीच हिवरे बाजार येथील लहान मुलाच्या बाबतीत घडलेली घटना माहीत होती, त्यांनी तातडीने पुन्हा भूलतज्ञ व इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर सुजित अडसूळ यांना यामध्ये मदत करण्याची सूचना केली. डॉक्टर अडसूळ यांनी लागलीच संवेदनशीलता ठेवून पुण्यामध्ये संपर्क साधला व वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये घेतलेल्या माहिती, पाठपुरावा व विनंतीनंतर भारती हॉस्पिटल मध्ये एक जागा त्यांना मिळाली आणि त्यांनी या अधिकाऱ्यांची तेथे पाठवणी केली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


खरंतर तसा विषय फार मोठा नव्हता, मात्र पुणे – मुंबई सारख्या ठिकाणी हजारोंनी रुग्ण वाढत असल्याने तेथे कशी परिस्थिती आहे याची प्रचिती बारामतीकरांना ही या माध्यमातून आली. या माजी पोलिस अधिकाऱ्याला एक बेड तेथे मिळाले, पण भविष्यात खरोखरच पुण्यामध्ये एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीलाही उपचारासाठी प्रतीक्षेतच राहावे लागेल असे संकेत यातून मिळत आहेत. अशावेळी दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणार्‍या बारामतीत यापुढील काळात खूप काळजी घ्यावी लागेल, येथील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने कमी ठेवून आयसीयू चे बेड कायम रिकामे राहतील, एवढी तरी नक्कीच काळजी घ्यावी लागेल, असाही धडा या घटनेतून मिळाला आणि बारामतीकर सातत्याने लागलीच इतरांच्या मदतीला धावून जातात हा संदेशही यातून मिळाला आहे.

Tags: BaramatiCorona VirusCorona WarriersDCM Ajit PawarHelping HandsStayHomeStaySafe
Next Post
दौंड शहरासह केडगाव,कुरकुंभमध्ये नव्याने कोरोनाचे रुग्ण.. दौंडकरांवरील कोरोनाचे संकट कायम

भय इथले संपत नाही; दौंड शहरासह तालुक्यात ८ नवे रूग्ण..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group