दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरातील कोरोना बाधितांची आकडयातील वाढ कायम असून आज नव्याने आठ रुग्णाची भर पडली आहे. बुधवारी कोरोना बाधित रुग्ण्याच्या संपर्कातील तब्बल ७५ जणांनाच्या घसातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. यात पाचजण शहरात, तर तालुक्यातील ग्रामीण भागातील तिघांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे, अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
शहरातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येताना दिसत नसुन त्यातील वाढ कायम असल्याचे चित्र आहे. तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनाही कोरोनाची लागण झालेल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. शहरातील माजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनाही कोरोनाची लागण झाल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, शहरातील कोरोना च्या वाढत्या संसर्गामुळे कोरोना बाधितांच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन दक्षता व खबरदारी म्हणून १४ दिवस संपूर्ण शहर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून दौंड पुरंदर चे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी जाहीर केले आहे. कोरोना चे वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत, तोंडाला मास्क न वापरणाऱ्या वर व विनाकारण फिरणाऱ्या वर पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.…..











