दौंड : महान्यूज लाईव्ह
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानवार मंगळवारी रात्री काही समाजकंटकांनी हल्ला करून तोडफोड केल्याच्या घटनेचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी दौंड तालुका चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
आज दौंडमध्ये संत श्रेष्ठ श्री.रोहिदास महाराज जयंती उत्सव समिती दौंड व समस्त चर्मकार समाज यांच्या वतीने या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करून कारवाई करावी, या घटनेचे मुळ सुत्रधार शोधून अटक करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
ही घटना अंत्यत दुर्दैवी असून राजगृह ही आमची अस्मिता व स्वाभिमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधलेले आहे आणि या घरावर जर कोणी हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही, शासनाने तातडीने अशा समाजकंटकांवर अटक करून कठोर कारवाई करावी, आशा घटना घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
तसेच राजगृहला कायमस्वरूपी पोलिस संरक्षण प्रदान केल्याबाबत प्रशासनाचेही आभार चर्मकार समाजाच्या वतीने मानले. यावेळी संत रोहिदास महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मजगर, सोमनाथ सोनवणे, निलेश मजगर, अजय वरपे, संजय सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.










