बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाचे संकट ओसरत चालले आहे, आणि पुन्हा कोट्यावधी रुपये वार्षिक पॅकेजच्या नोकऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना मिळू लागल्या आहेत.
अनेक नामवंत कंपन्या आयआयटी कॅम्प्समध्येच प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतात. त्यातील त्यांच्या उपयोगी विद्यार्थ्यांला ते त्यांच्या कंपनीत नोकरीची ऑफर देतात. यातून शिक्षण पुर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्याच्या हातात नोकरी असते. कोरोनाच्या काळात थांबलेला हा शोध आता पुन्हा सुरू झाला आहे.
यावर्षी अशा मुलाखतीतून आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑफर एका विद्यार्थ्याला मिळाली आहे. भारतामध्येच त्याला १.८ कोटी रुपये वार्षिक पगाराची नोकरी मिळाली आहे. दुसऱ्या एका विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय कंपनीकडून २ कोटी वार्षिक पगाराची ऑफर आली आहे. उबेर या कंपनीने पाच आयआयटीमधून प्रत्येकी १ विद्यार्थी निवडला आहे. आयआयटी मुंबई व आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्याला २.०५ कोटी वार्षिक पगाराची ऑफर आहे. तर आयआयटी रोरकी येथील विद्यार्थ्याला र.१५ कोटी वार्षिक पगाराची ऑफर आहे. बाकीच्या तिघांना १.३० कोटी ते १.८० कोटी रुपये वार्षिक पगाराच्या
ऑफर मिळाल्या आहेत.
यानंतरची सर्वात मोठी ऑफर रुब्रिक या क्लाऊड डाटा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीकडून ९०.६ लाख रुपये वार्षिक पगाराची आहे.
मिलेनियम या गुंतवणूक व्यवस्थापनातील कंपनीने एका विद्यार्थ्याला ६२ लाख रुपये वार्षिक पगाराची ऑफर दिली आहे. वर्ल्डकॉन्टने ५२.७ लाखाची तर ब्लॅकस्टोनने ४६.६ लाख रुपये वार्षिक पगाराची ऑफर दिली आहे.
आयआयटी मद्रासच्या ११ विद्यार्थ्यांनाआंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून तर एकुण ४०७ विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत.
एकंदरीत तुमची योग्यता असेल तर तुमच्यासाठी संधी उपलब्ध आहेत.