सावता परिषदेचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
मंठा (जि.जालना) येथील नवविवाहिता वैष्णवी गोरे हिची क्रुर हत्या करण्यात आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सावता परिषदेने उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आरोपीस कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे , युवा आघाडी तालुका अध्यक्ष अमर बोराटे, सचिन शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बनसुडे, तालुका उपाध्यक्ष विष्णु झगडे, तालुका कार्याध्यक्ष मच्छिंद्र भोंग यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणा-या गरीब गोरे कुटुंबातील एकुलती एक असणा-या वैष्णवीचा नुकताच विवाह झाला होता. विवाहानंतर आपल्या गावी मंठा येथे परत आल्यावर वैष्णवी हिचा भर चौकात आरोपीने निर्दयपणे गळा चिरून खून केला.हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येवून आरोपीस फाशी देण्यात यावी, सरकारी वकील म्हणून ॲड.उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, हे प्रकरण अंडर ट्रायल चालेल यासाठी संबंधित यंत्रणेस आदेश करावा अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलने करण्यात येतील असा इशाराही सावता परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.










