बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहर आणि तालुक्यात शनिवारी पाच कोरोनाचे रुग्ण आढळले होते. या रुग्णांच्या संपर्कातील ५४ जणांपैकी ५१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर उर्वरीत तीनजणांचा अहवाल येणे बाकी असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामतीत शनिवारी एकाच दिवशी पाचजणांना कोरोनाची लागण झाली होती. या पाचजणांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आरोग्य विभागाने तपासणी केली. त्यामध्ये काल ५४ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. या ५४ जणांपैकी ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत तिघांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या बारामतीत अचानकपणे कोरोनाने डोके वर काढले आहे. शनिवारी बारामती शहरातील तिघांना, तर काटेवाडी आणि सावळ येथील दोघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता या रुग्णांच्या संपर्कातील ५४ पैकी ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरीकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.










