• Contact us
  • About us
Monday, September 7, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूर बायपासला अपघात ! दोन लहान मुले व वृद्ध जखमी ! पोलिसांची माणूसकी तर शासकीय डॉक्टरांची बेफिकीरी !

Maha News Live by Maha News Live
November 27, 2021
in सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, Featured
0

इंदापूर : महान्युज लाईव्ह

इंदापूर बायपास रोडला भीमाई आश्रम शाळेच्या चौकात रस्त्याच्या कडेला फळे विक्रेत्यांकडून फळे घेण्यासाठी थांबलेल्या दोन लहान मुलांना व फळ विक्रीच्या वृद्ध महिलेस महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन लहानग्यांसह वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. गंभीर जखमी झालेल्या तिघेही दवाखान्यात नेण्यासाठी वाहन वेळेवर येत नसल्याचे दिसून आले. अशावेळी जवळच असणाऱ्या सुपर महामार्गावरील हॉटेल मध्ये जेवण करत असणाऱ्या तीन पोलिसांनी हे विदारक दृश्य पाहताच जखमींना उचलण्यासाठी ते समोर आले . त्या तिघांनी रस्त्यावर विव्हळत पडलेल्या जखमींना तातडीने उचलून आपल्या वाहनात बसवून तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. एरव्ही गुन्हेगारांना वठणीवर आणणा-या पोलिसांच्या या तत्परतेमुळे पोलिसांची माणुसकी पुन्हा एकदा समोर आली.

पोलीसांनी वेळेवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने अपघातातील जखमींचे प्राण वाचले असे तरी, कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा दिसून आला. या प्रकारामुळे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथानपणाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. शासकीय रुग्णालयाच्या गेटसमोरच आपला खाजगी दवाखाना थाटलेल्या या डॉक्टरने आपल्या खाजगी दवाखान्यातील रुग्णाकडे लक्ष देण्याच्या प्रकाराने अपघातातील जखमींना उपचार देण्यास जवळपास अर्धा तास उशीर केला. विशेष म्हणजे विव्हळत असणाऱ्या जखमींना पाहूनही ते डॉक्टर तिथून गेल्याने जखमींना उपचार मिळण्यासाठी बराच वेळ तिष्टत बसावे लागले.

काल (२६ नोव्हेंबर) इंदापूर शहराच्या बायपासवरील भिमाई आश्रम शाळेच्या चौकात हा अपघात झाला.भिवंडीहून भाविकांना घेऊन देवदर्शनासाठी तुळजापूरला निघालेली खाजगी बस इंदापूर शहराच्या बायपासवरील भिमाई चौकात सायंकाळी सव्वापाच वाजता चहापणासाठी थांबली असताना बसमधील माही केशरनाथ पाटील (१३ वर्षे) आणि आदी रुपेश बाबरे (१० वर्षे) हे दोघे लहानगे जवळच असलेल्या फळविक्रेत्याकडे पेरू घेण्यासाठी थांबले होते. दरम्यान, पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकचा पाटा तुटल्याने ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि क्षणार्धात ट्रकने या दोघा लहानग्यांसह वयोवृद्ध फळविक्रेत्या महिलेलाही धडक दिली. अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी कोणतेही वाहन थांबत नसल्याने जखमी बराच वेळ रस्त्यावरच रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. मात्र जवळच्याच हॉटेलमध्ये जेवण करत असलेले इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मनोज प्रविण गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल रोशन नवनाथ मुटेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण संजय शिंगाडे या इंदापूर पोलीस ठाण्याच्या तिघा देवदूतांनी घटना समजताच वेळ न दवडता आणि रुग्णवाहिकेची वाट न पाहता स्वतः जखमींना उचलत आपल्या खाजगी वाहनातून तात्काळ इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकलूजच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मात्र जखमींना उपचार देण्यास जवळपास अर्धा तास उशीर केला. मात्र इंदापूरच्या उपजिल्हा शासकीय रुग्णालयात मात्र हलगर्जीपणाचा कळस झाला. तेथे कर्तव्यावर असलेले डॉक्टर महाशय जखमींना पाहूनही फोनवर बोलत बोलत तेथून खुशाल निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडीमारानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली.व रुग्णालयातून गायबही झाले.

Next Post

महावितरणविरोधात तीव्र आंदोलनाचा शिरूर भाजपाचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group