साताऱ्याप्रमाणे सांगली जिल्हा बॅंकेतही धक्कादायक निकाल लागलेले असून पहिल्याच फेरीच कॉंग्रेसचे जतचे आमदार विक्रम सावंत हे पराभूत झाले आहेत. भाजपाच्या पॅनेलमधील प्रकाश जमदाडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. आमदार सावंत हे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मावसभाऊ आहेत.
याखेरीज आटपाटीतून शिवसेनेचे तानाजी पाटील विजयी झाले असून त्यांनी माजी आमदार राजेंद्र आण्णा यांचा पराभव केला आहे.
सांगली जिल्हा बॅंकेच्या तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, वाळवा या सोसायटी गटातील जागा महाआघाडीकडे असून त्याठिकाणी अनुक्रमे बी.एस.पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आ. मोहन कदम, विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील विजयी झाले आहेत. सोसायटी गटात एकुण १० जागा असून त्यामध्ये राष्ट्रवादी ३, शिवसेना ३, कॉंग्रेस ३ असून भाजपाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
सांगली जिल्हा बॅंकेसाठी एकुण २१ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत तर १८ जागांवर लढत होती. यावेळी महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविली आहे.











